महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लावलेले बॅनर... आव्हाड समर्थकांनी उतरवले

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर छापलेले (offensive content against Jitendra Awad) बॅनर आज मुलुंड टोल नाका येथे विरोधकांकडून (oppositions) लावण्यात आले होते. या बॅनरमुळे आव्हाड समर्थकांमध्ये संताप पसरल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सदरचे बॅनर फाडून (NCP supporters removed posters) टाकले व आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

By

Published : Jan 6, 2023, 4:27 PM IST

Jitendra Awhad
आव्हाड समर्थकांनी उतरवले

घोषणा देतांना जितेंद्र आव्हाड समर्थक

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे सरकार मधील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर छापलेले बॅनर (offensive content against Jitendra Awad) आज मुलुंड टोल नाका येथे लागल्याने, आव्हाड समर्थकांमध्ये संताप पसरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सदरचे बॅनर फाडून (NCP supporters removed posters) टाकले व आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. गेल्या काही दिवसात आव्हाड यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षाने मोर्चा उघडला असून, आव्हाड यांना टार्गेट करण्यात आले आहे. आज सकाळी ठाणे मुलुंड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तींनी (oppositions) जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दल आक्षेपार्य टिपणी करणारे पोस्टर्स लावले या पोस्टर्स बाबत माहिती मिळताच ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून; त्यांनी काही ठिकाणी पोस्टर फाडले तर, काही ठिकाणचे पोस्टर्स पोलिसांना काढायला लावले. जर हिम्मत असेल तर समोर नाव घेऊन पोस्टर लावा, असे खुले आवाहन देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिले आहे.

आव्हाड विरोधकांच्या निशाण्यावर : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नव्हता, असे विधान केले. त्यांच्या या विधानावरुन भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर गरळ ओकली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना औरंगजेबचा पुळका आला असल्याचे म्हणटले होते. जितेंद्र आव्हाड यांचे औरंगजेब बाबतचे विधान आणि ईतर वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे.

आता पोस्टर वाद: आज सकाळी ठाणे मुलुंड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तींनी जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दल आक्षेपार्य टिपणी करणारे पोस्टर्स लावले, या पोस्टर्स बाबत माहिती मिळताच ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून; त्यांनी काही ठिकाणी पोस्टर फाडले तर, काही ठिकाणचे पोस्टर्स पोलिसांना काढायला लावले. जर हिम्मत असेल तर समोर नाव घेऊन पोस्टर लावा, असे खुले आवाहन देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिले आहे. आता यापुढे हा पोस्टर वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.

संभाजी महाराजावरुन वाद सुरुच : गेल्या अनेक दिवसांपासुन महापुरुषांच्या नावावरुन आणि त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींवरुन वाद चिघळतांना दिसत आहे. याआधी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते की धर्मवीर होते, यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये वाद सुरु होता. अखेरिस मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी अनेक गोष्टींचा आणि इतिहासाचा दाखला देत अजित पवार यांना आपले समर्थन दिले. त्यानंतरही यावर अनेक तर्क-वितर्क आणि विधाने सुरुच आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details