ठाणे : हरहर महादेव मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक ( MLA Jitendra Awhad arrested ) केली आहे. विवियाना मॉलमधील हर हर महादेवच्या शोवेळी झालेल्या मारहाण प्रकरणांमध्ये जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad arrest case sloganeering ) यांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडफोड करणाऱ्या चित्रपटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awad ) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या अटके प्रकरणी घोषणाबाजी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव मराठी चित्रपट ( Har Har Mahadev Marathi Movie ) चर्चेचा विषय बनला आहे. त्याचा शो ठाण्यात सुरू असताना बंद करण्यात आला. या प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav ) या ठिकाणी मॉलमध्ये पोहचले. त्यानंतर त्यांनी पुन्हा शो सुरू केला होता. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्यांना तात्काळ अटकदेखील करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या अटके प्रकरणी घोषणाबाजी दहा कार्यकर्त्यांना अटक -हर हर महादेव सिनेमा बंद करण्यासाठी गेलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी सिनेमा बंद पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये हरकत नोंदवणाऱ्या एका प्रेक्षकांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणांमध्ये जितेंद्र आव्हाडसह त्यांच्या दहा कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी ठाणे पोलिसांनी त्यांना सुरुवातीला चौकशीला बोलावलं आणि त्यानंतर संध्याकाळी उशिराने त्यांना अटक दाखवण्यात आली आहे जितेंद्र आव्हाड हे हर हर महादेव चा शो बंद करण्यासाठी जेव्हा मॉलमध्ये गेले तेव्हा एका प्रेक्षकाने त्यांना विरोध केला त्यानंतर शिवीगाळ झाल्यामुळे आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रेक्षकाला मारहाण केली आणि या संदर्भामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तक नगर पोलिसांनी चौकशीला बोलवून अटक केली आहे.
हरहर महादेव मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक सुरू झाला ड्रामा - जितेंद्र आव्हाड यांना चौकशीला बोलावल्यानंतर त्यांनी याबाबत ट्विटर फेसबुक या माध्यमातून माहिती दिली आणि त्यानंतर वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर हजारो कार्यकर्त्यांची रीघ लागली यादरम्यान जितेंद्र आव्हाड यांना आज न्यायालयात घेऊन जाता आलं नाही त्यामुळे आज जितेंद्र आव्हाड यांना वर्तक नगर पोलीस ठाण्यातच ठेवावा लागणार आहे उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चित्रपटगृहात घुसून शो थांबण्याची विनंती - ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी हर हर महादेव चित्रपट शो बंद पाडला. हर हर महादेव हा शो रात्री १० वाजता सुरू होता. याचवेळी शो सुरू असताना स्वतः आव्हाड यांनी प्रेक्षकगृहात घुसून शो थांबण्याची विनंती केली. यावेळी प्रेक्षक आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले होते.