ठाणे -राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्या अनोख्या अंदाजात विरोधकांना धारेवर धरण्यासाठी कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांनी चक्क "तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद” हे गाणे म्हणून विरोधकांची फिरकी घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी हे गाणे गायिले.
VIDEO : 'तेरी गलियों में न रखेंगे कदम' जितेंद्र आव्हाडांचा भाजपला सुरेल टोला - song by jitendra avhad
आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत. सूत्र संचलन मात्र संजय राऊत करत आहेत तर, त्यांच्या मनात येणारे गाणे "तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद” असेल. हे गाणे गात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरेधकांची फिरकी घेतली.
हेही वाचा -आशिष शेलार खोटं बोलतात पण रेटून बोलतात - जितेंद्र आव्हाड
भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना आणि आघाडी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. या सगळ्या सत्ता नाट्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ही दोन नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. आव्हाड म्हणाले, आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत. सूत्रसंचलन मात्र संजय राऊत करत आहेत तर, त्यांच्या मनात येणारे ''गाणे तेरी गलियों में न रखेंगे कदम, आज के बाद” असेल. आव्हाड यांनी नुसते गाण्याचे नाव नाही सांगितले तर ते गाणे गायले सुद्धा. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आव्हाड यांनी भाजपला पुन्हा एकदा सुरेल टोला लगावला आहे.