ठाणे: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी मुंब्रा येथे सुमारे 400 मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले होते. कोणताही पुरावा नसताना अशा पद्धतीने भाष्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सध्या दंगली होत आहेत. काल गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले आहे. हा तर मुंब्रा आणि परिसराला बदनाम करण्याचा विषय तर आहेच शिवाय, हिंदू धर्मालाही बदनाम करण्याचा डाव आहे.
शहराला बदनाम करण्याचे काम : हिंदू धर्मातील मुले एवढी मुर्ख आहेत की, ती स्वत:चे धर्मांतर करुन घेतील? त्यांनी गाझीयाबादच्या त्या पोलीस अधिकाऱयाला जाहीर आव्हान केले की, त्यांनी पुढे येऊन धर्मांतर करणाऱया मुलांचे नाव-पत्ते जाहीर करावेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यांनी केवळ चारच नावे जाहीर करावे. जर, खरोखर धर्मांतर झाले असेल तर त्याची दखल पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी घ्यायला हवी होती. जर चारशे मुलांचे धर्मांतर केले जात असेल तर हे अधिकारी काय करत होते? हा प्रकार म्हणजे एका शहराला बदनाम करुन त्याची अर्थव्यवस्था धुळीस मिळविण्याचा प्रयत्न आहे. आज मुंब्रा, कौसा, शिळ या भागात 5 कोटी चौरस फुटांचे अधिकृत बांधकाम सुरु आहे. अशा खोट्या बातम्या पसरवून अर्थव्यवस्था उदध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गाझीयाबाद येथील एका आयपीएस अधिकाऱयाने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतर झाले असल्याचे जाहीर केले. लीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. आपण राजीनामा द्यायला तयार आहोत, तसेच धर्मांतर झाल्याचे सत्य बाहेर न आणल्यास, 1 जुलैला मुंब्रा बंद -जितेंद्र आव्हाड
संविधानाच्या आधारामुळे धर्मांतरे बंद : धर्मांतराची ही बातमी खोटी आहे पण, तपासानंतरही ती खोटी निघाली तर काय करायचे. मुंब्य्राला हाताशी धरुन सबंध ठाण्याचे वातावरण खराब करायचे आहे. मग, जितेंद्र आव्हाड तिथे आहेत. मग, आपल्यावर तलवार चालवायची. माझ्या एकट्यासाठी काय काय करणार आहात? आता संविधानाच्या आधारामुळे धर्मांतरे बंद झाली आहेत. ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले होते; त्यांनी त्यावेळी धर्मांतरे केली होती. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आता तुम्ही या संविधानावरच तलवार चालवित आहात. हिंदू धर्माचा अपमान करणारे हे कोण आहेत? 400 मुलांनी धर्मांतर केल्याचा काय पुरावा आहे? ही चारशे मुले दाखवा, आपण राजीनामा द्यायला तयार आहोत. असे आव्हाड म्हणाले.