ठाणे - शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागायची आणि त्यांनाच पुस्तकातून हद्दपार करणारे हे मनुवादी सरकार असल्याचे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड सरकारवर टीका करताना हेही वाचा - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहफुलची २६९ लिटर दारू जप्त
एकीकडे शिवछत्रपतींच्या नावाने मतं मागणारे आणि शाळकरी मुलांच्या पुस्तकातूनच महाराजांना हद्दपार करण्याचे कारस्थान भाजपने केल्याचा आरोप आव्हाडांनी केला. ज्या वयात छत्रपतींचे चरित्र वाचून त्यांचे संस्कार, विचार, आदर्श लहान मुलांवर होऊन समाज पुढे जातो. त्याच वयात मुलांच्या मनावर आपल्या मनुवादी विचारांची पकड व्हावी यासाठी हे कारस्थान केल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या धमन्यांमध्ये, प्रत्येक अणु, रेणूमध्ये शिवछत्रपती विराजमान असून आम्ही सत्ताधाऱ्यांचे हे कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - पुस्तकातून शिवरायांचा धडा बाजूला करणाऱ्या सरकारला हाकलून लावा - अशोक चव्हाण