ठाणे - बंद कारखान्यातील यंत्रसामग्री चोरून विकल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथून अटक करण्यात आली आहे. भिवंडी शहरातील नवीवस्ती भागातील कारखान्यातून यंत्रसामुग्री चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हारुन अबुलजैस खान (३५ ) असे अटक केलेल्या युवक अध्यक्षाचे नाव आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष चोरी करताना सापडला; आजमगढ येथे अटक
आरोपी हारुन याने तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मोहल्ल्यातील बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील साहित्य अन्य पाच साथीदारांच्या मदतीने चोरून एका व्यापाऱ्याला विकले होते. या चोरीचा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
आरोपी हारुन याने तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मोहल्ल्यातील बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील साहित्य अन्य पाच साथीदारांच्या मदतीने चोरून एका व्यापाऱ्याला विकले होते. या चोरीचा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यातील तीन चोरट्यांना यापूर्वीच अटक केली आहे. मात्र, हारून खान याला पोलीस अटक करतील याची कुणकूण लागताच तो त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशमध्ये पळून गेला होता.
तो अजमगढ येथे असल्याचे समजताच भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे यांचे पोलीस पथक उत्तर प्रदेशमध्ये गेले. तिथे हारुन खान याला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी हारून खान याला आज (मंगळवारी) भिवंडीत दाखल करण्यात येणार आहे.