ठाणे -कोरोना महामारीच्या काळात अनेक भयानक घटना समोर आल्या. यामध्ये कोणाची नोकरी गेली, तर कोणचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकजण अनाथही झाले. ठाण्यातील एक 19 वर्षीय तरुणीही अनाथ झाली आहे. तिच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. आता आपला एकमेव आधार असलेल्या आईलाही कोरोनामुळे तिने गमावले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने तिला आधार दिला आहे. शिवाय, आईचे निधन झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या ठाण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला राष्ट्रवादीकडून नोकरीही देण्यात आली आहे. दिव्या शर्मा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कोपरी येथे राहते.
सुप्रिया सुळेंच्या हस्ते ऑफर लेटर
सोमवारी (21 जून) दिव्याच्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात तिला ऑफर लेटर देण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, रोजगार स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रदेश प्रमुख डॉ. ओमकार हरी माळी यांच्या पुढाकाराने दिव्याला रोजगाराची संधी देण्यात आली.