ठाणे - ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रचारात आघाडी घेऊन सकाळ सकाळी नागरिकांची तसेच मतदारांची भेट घेतली. प्रचाराचा थोडाही वेळ वाया न घालवता सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. आनंद परांजपे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या ठिकाणी जाऊन मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली.
आनंद परांजपे यांची प्रचारात आघाडी.. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या भेटीगाठी - मॉर्निंग वॉक
राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर या ठिकाणी जाऊन मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली.
पुढील काही दिवस अशाच पद्धतीन प्रचार करणार असून या प्रचारात ते वेगवेगळ्या रेल्वे स्थानकात जाऊन तेथील समस्यांचा आढावा घेणार आहे. दररोज लाखो लोक रेल्वे प्रवास करतात पण या वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेक उणिवा आहेत महसुली उत्पन्न जास्त असुनही त्या प्रमाणात सुविधांचा अभाव आहे त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
सकाळच्यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक, युवक व्यायामासाठी बाहेर पडतात. याचाच फायदा घेत त्यांना सकाळी भेटून आनंद परांजपे मतदानाचे आवाहन करणार आहेत.