महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापुरात राष्ट्रवादीकडून आश्वासनांचे फुगे सोडून युती सरकारचा निषेध

मागील पाच वर्षांपासून युतीचे स्थानिक खासदार आणि आमदार यांनी विविध विकासकामांचे बदलापूरकरांना आश्वासनांचे गाजर दाखवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

बदलापूरात राष्ट्रवादीकडून आश्वासनांचे फुगे सोडून युती सरकारचा निषेध

By

Published : Sep 18, 2019, 6:26 PM IST

ठाणे -पाच वर्षांपासून स्थानिक आमदार आणि खासदारांनी बदलापुरातील नागरिकांना विकासाची आश्वासने देत आहेत. मात्र, त्या नागरी कामांच्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार, खासदारांचा आकाशात आश्वासनांचे फुगे सोडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

मागील पाच वर्षांपासून युतीचे स्थानिक खासदार आणि आमदार यांनी विविध विकासकामांचे बदलापूरकरांना आश्वासनांचे गाजर दाखवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यातच गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक लोक प्रतिनिधींनी दिलेल्या चोवीस तास पाणी, होम प्लॅटफॉर्म, डॉ. आंबेडकर स्मारक अशा अनेक आश्वासनांची पूर्तता झालेली नसून फक्त उद्घाटनांचा धडाका सुरू आहे.

बदलापूरात राष्ट्रवादीकडून आश्वासनांचे फुगे सोडून युती सरकारचा निषेध

हे ही वाचा -आमदाराचं दत्तक गाव-पाण्यासाठी धावाधाव, खोतकरांच्या नंदापूरमध्ये ४ रुपयाला हंडा

आधीची कामे पूर्ण झाली नसून नवीन कामाची मंजुरी आणि विकास आराखडा यांची मंजुरी मिळवली. मात्र, ज्या नावानी आराखड्यांना मंजुरी मिळाली ती कामे आता किती दिवसात होतात, हे पाहणे महत्वाचे आहे. तर विकास कामे अद्यापही रखडल्याच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करीत राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी आश्वासनांचे फुगे आकाशात सोडून युती सरकारचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया अविनाश देशमुख यांनी दिली. या अनोख्या आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे शहर सचिव व संघटक हेमंत रुमणे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, आर.पी.आय ऑफ आर.के शहराध्यक्ष सुनील बापू , दपटे, संजय करंडे, महिला जिल्हा अध्यक्षा अनिता पाटील, अजित भोईर, स्वप्नील सोनवणे हे उपस्थित होते.

हे ही वाचा -निवडणूक आयोगाची बैठक, निवडणूक तयारीचा आढावा व विविध उपक्रमांचे उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details