मीरा-भाईंदर (ठाणे)- मीरा रस्त्याच्या शीतलनगर परिसरात नाकाबंदी असताना अंदाजे चार टन जनावरांचे मास बेकायदा विक्री करण्यासाठी आलेला टेम्पो जप्त करण्यात आला. नया नगर पोलिसांनी चालकासह त्याच्या एका साथीदाराला अटक करून गुन्हा दाखल केला.
मीरा-भाईंदर शहरात या अगोदरदेखील बेकायदेशीर मांसाची विक्री वाहतूक कत्तल होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र. मीरा-भाईंदर शहरातील पोलीस कर्मचारी, मनपातील आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, आर्थिक बाबी तडजोड करून मदत केली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात मांस शहरात येतेच कसे? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. नयानगर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान चार टन जनावरांचे मांस भरलेला टेम्पो पकडला. दोन जणांना अटक देखील केली आहे. मात्र, हे नेमके आले कुठून? यांचा मुख्य सूत्रधार कोण आहे? ही बेकायदेशीर कत्तल होते कुठे? यांचा खोलात जाऊन तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे.