नवी मुंबई -वॉटर टॅक्सीमुळे नवी मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबईला जाण्यासाठी नवी मुंबईकरांना बराच वेळ खर्ची करावा लागतो. दीड तासांचा भरभक्कम प्रवास करत मुंबई गाठावी लागते. मात्र आता वॉटर टॅक्सीमुळे अवघ्या 30 मिनिटात नवी मुंबईकरांना मुंबई गाठता येणार आहे. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज (गुरुवारी) करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
- 700 ते 1200 रुपये लागणार मोजावे
नवी मुंबई येथील बेलापूर जेट्टीवरून वॉटर टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना प्रति व्यक्ती 700 ते 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या लोकापर्ण सोहळ्यात ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी या वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने केले.
- 7 स्पीडबोटी आणि एक कॅटामरान बोट सेवेत