महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक: भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेत?

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना गणेश नाईक गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवी मुंबई तुर्भे मधील भाजपचे चार नगरसेवक शिवसनेच्या वाटेवर आहेत. भाजपचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचा हा अघोषित प्रवेश मानला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक

By

Published : Feb 8, 2020, 7:40 AM IST

नवी मुंबई- येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील गणेश नाईक यांचे अस्तित्व खिळखिळे करण्यासाठी नुकताच महाविकासआघाडीच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा घेण्यात आला होता. मात्र, आता खरोखरच नाईक गटाला धक्का बसणार आहे. कारण भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रिलायक माहिती सुत्रांच्या हातून मिळाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक

हेही वाचा-देवेंद्र फडणवीसांचा ई-स्कूटरवरून फेरफटका मात्र पदाधिकाऱ्यांची दमछाक


नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना गणेश नाईक गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवी मुंबई तुर्भे मधील भाजपचे चार नगरसेवक शिवसनेच्या वाटेवर आहेत. भाजपचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचा हा अघोषित प्रवेश मानला जात आहे. याबाबत त्यांना विचारले असता, प्रवेशाबाबत अजून ठरले नसल्याचे सांगितले. मात्र, तरी सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. तसेच सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुकही केले व तुर्भे मधील झोपडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details