नवी मुंबई -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, तसेच आयसीयू खाटा व व्हेंटिलेटर उपलब्धतेमधील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने मोफत सेवा उपलब्ध व्हावी म्हणून करार केला आहे. यामुळे गरजू रुग्णांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबईतील रुग्णांच्या मोफत उपचारासाठी पालिकेचा करार... - नवी मुंबई पालिकेचा डाॅ. डी वाय पाटील रूग्णालयासोबत करार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, तसेच आयसीयू खाटा व व्हेंटिलेटर उपलब्धतेमधील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने मोफत सेवा उपलब्ध व्हावी म्हणून करार केला आहे.
नवी मुंबई परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 16 हजारांच्या पुढे गेला आहे. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 1 हजार 183 खाटा व 483 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 75 आयसीयू खाटांची उपलब्धता या अगोदर करून देण्यात आली होती. मात्र, नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पाहता आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर उपलब्धतेमधील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तत्पर पावले उचलत नेरूळ येथील डाॅ. डी वाय पाटील रूग्णालयासोबत 200 आयसीयू बेड्स आणि 80 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्याचा करार नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. 10 ऑगस्टपर्यंत 50 आणि पुढे 10 दिवसांच्या 3 टप्प्यात 10 सप्टेंबरपर्यंत एकूण 200 आयसीयू बेड्स व 80 व्हेंटिलेटर नवी मुंबईच्या नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले जातील, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे.