महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर

नवी मुंबई महानगर पालिकेने देशातील तृतीय क्रमांकाचा स्वच्छ शहराचा राष्ट्रीय बहुमान पटकावला आहे. मागील वर्षी 2019 ला झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात 7 व्या क्रमांकावरून तृतीय क्रमांकावर यशस्वी झेप घेतली आहे. तसेच राज्यात नवी मुंबई महापालिका प्रथम क्रमांच स्वच्छ शहर म्हणून घोषित केले आहे .

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर

By

Published : Aug 20, 2020, 4:34 PM IST

नवी मुंबई-केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई याच सर्वेक्षणात सातव्या क्रमांकावर होती. मात्र यंदा शहराने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्यात नवी मुंबई महापालिकेला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ शहर सर्वेक्षण योजना सुरू केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनं सातत्यानं टॉप टेनमध्ये येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने देशातील तृतीय क्रमांकाचा स्वच्छ शहराचा राष्ट्रीय बहुमान पटकावला आहे. संबधित राष्टीय सन्मान स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक व सफाई कामगार यांच्यामुळे प्राप्त झाला आहे असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हटले आहे.

इंदोर शहराने सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला आहे. तर गुजरात मधील सुरत दुसरे आणि नवी मुंबई हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.

मागील वर्षी 2019 ला झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात 7 व्या क्रमांकावरून तृतीय क्रमांकावर यशस्वी झेप घेतली आहे. तसेच राज्यात नवी मुंबई महापालिका प्रथम क्रमांच स्वच्छ शहर म्हणून घोषित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details