नवी मुंबई - गँगस्टर राजेश कैकाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर गुन्हांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग आहे. खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले, अशा भयानक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या राजेश कैकाडीला पनवेल शहर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे.
नवी मुंबईत गँगस्टर राजेश कैकाडी पोलिसांच्या जाळ्यात - गँगस्टर राजेश कैकाडीला अटक
गँगस्टर राजेश कैकाडी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर गुन्हांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग आहे. खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले, अशा भयानक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या राजेश कैकाडीला पनवेल शहर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे.
करंजाडे येथील बिल्डर तक्रारदाराला आरोपी राजेश कैकाडी ऊर्फ राजा कैकाडी याने बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्यास विरोध करून पैशांची मागणी केली. तसेच आरोपी राजेश कैकाडी याने तक्रारदाराला पिस्तुलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलीस उप-आयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्यासह पोलीस अधिकारी राहुल सोनावणे, निलेश राजपूत, राजेंद्र जाधव, कादबाने यांनी आरोपी राजेश कैकाडी याचा शोध घेतला. आणि रात्री २ वाजण्याच्या सुमारास करंजाडे येथील त्याच्या राहत्या घरून त्याला अटक केली.
यावेळी आरोपीकडे २५ हजार रुपये किमतीचे विदेशी बनावटीचे पिस्तूल सापडले. आरोपी राजेश कैकाडी याची रवानगी आता तळोजा तरुंगात करण्यात आली आहे. तसेच परिसरातील बिल्डर्स व नागरिकांनी असे प्रसंग ओढवल्यास तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे.