महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेश नाईकांच्या गडाला सुरुंग, भाजप नगरसेवकांचा गट अजित पवारांच्या भेटीला

माजी मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ला संमजला जाणाऱ्या नवी मुंबईत त्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यांच्या गटाच्या ६ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नगरसेवक घरवापसी करणार असल्याची माहिती मिळते आहे.

Navi mumbai corporation 6 corporter meets deputy CM Ajit pawar
गणेश नाईकांच्या गडाला सरुंग

By

Published : Feb 13, 2020, 5:35 PM IST

Updated : Feb 13, 2020, 11:26 PM IST

नवी मुंबई - माजी मंत्री गणेश नाईक यांच्या गटाला पुन्हा एकदा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या गटाचे ६ नगरसेवक पक्ष सोडण्याच तयारीत आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे.

येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी नुकताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. नाईक गटाचे (भाजपचे) ४ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. आत्ता पुन्हा एक झटका नाईक गटाला बसणार आहे. कारण गणेश नाईक यांच्या सोबत भाजपवासी झालेले नगरसेवक घरवापसीच्या तयारीत आहेत. याच अनुषंगाने या ६ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा 53 नगरसेवकांनी नाईकांसोबत भाजपप्रवेश केला होता. मात्र, नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असतानाच नवी मुंबईच्या तुर्भेमधील भाजपचे ४ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती काही दिवसापूर्वी मिळाली होती. सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तसेच सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुकही केले व तुर्भे मधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील असेही आश्वासन दिले होते. अगोदर चार नगरसेवक शिवसेनेत जात असल्याचा धक्का पचवीत असतानाच नाईक गटाला पुन्हा एक धक्का ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसणार आहे. कारण संदीप सुतार, सलोजा सुतार, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत पाटील व राजू शिंदे या नगरसेवकांनीही नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपवासी झालेल्या नगरसेवकांच्या घरवापसीचा फटका गणेश नाईक गटाला बसणार आहे. कोणाच्या येण्याने जाण्याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे सागर नाईक यांनी म्हटले आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फटका बसल्याने याचा परिणाम काय होणार, याची उत्सुकता सर्व स्तरात आहे. मात्र 10 नगरसेवक जाण्याने नाईक गटांचे अस्तित्वाला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Last Updated : Feb 13, 2020, 11:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details