ठाणे -महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुक नेत्यांच्या मुलांनी भाग घेतल्याने रंगतदार होत आहे यात शंका नाही. त्यात आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. मुंब्रा येथील प्रचार रॅलीत राष्ट्रवादीचे उमेदवार आव्हाड यांच्यासोबत मुलगी नताशा हीनेदेखील हजेरी लावली.
वडिलांच्या मदतीला लेक आली धावून; नताशा आव्हाडची प्रचारात उडी - मुंब्रा विधानसभा मतदार संघ
मुंब्रा येथील झालेल्या प्रचार रॅलीत राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत त्यांची मुलगी नताशा हीनेदेखील हजेरी लावली. नताशाच्या उपस्थितीने सर्वांनाच चकीत केले होते. नताशा आव्हाड या नव्या चेहऱ्याला टक्कर देण्यासाठी सेना-भाजप युतीकडून कोणता चेहरा आणला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा -विधानसभेसाठी पत्ता कट झालेल्या भाजप मंत्र्यांचे पुनर्वसन; गोवा मुखमंत्र्यांचे संकेत
ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले यंदा निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. ज्यानी उमदवारी अर्ज भरले नाहीत ते प्रचाराच्या धुरा सांभळताना दिसत आहे. अशातच, जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्या पाठोपाठ मुलीनेही प्रचाराच्या रणधुमाळीत स्वतःला झोकून दिलेले पहायला मिळाले. नताशाच्या उपस्थितीने सर्वांनाच चकीत केले होते. नताशा आव्हाड या नव्या चेहऱ्याला टक्कर देण्यासाठी सेना-भाजप युतीकडून कोणता चेहरा आणला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.