महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरफोडीच्या गुन्ह्यातील 8 सराईत चोरटे जेरबंद; 63 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत - ठाणे घरफोटी बातमी

नारपोली पोलिसांनी घरफोडीतील ५ गुन्हे उघडकीस आणून, आतापर्यत ८ सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळ्यात यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ६३ लाख ९३ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

crime
अटक केलेले आरोपी

By

Published : Oct 1, 2021, 9:40 PM IST

Updated : Oct 1, 2021, 9:51 PM IST

ठाणे - अनलॉक काळात भिवंडीतील गोदाम पट्ट्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यातच नारपोली पोलिसांनी घरफोडीतील ५ गुन्हे उघडकीस आणून, आतापर्यत ८ सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळ्यात यश आले आहे. या चोरट्यांकडून तब्बल ६३ लाख ९३ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती भिवंडी झोनचे पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

माहिती देताना डीसीपी योगेश चव्हाण
  • पहिल्या गुन्ह्यातील त्रिकूटाकडून १४ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त -

आजाद कुमार धरमचंद देरासरीया (वय ५९ वर्षे, रा. घाटकोपर ( पुर्व ) मुंबई) यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तकार दिली की, २६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या पूर्णा गावात असलेल्या जय भारत इम्पेक्स ' या कंपनीचे गोडाऊन फोडून चोरटयांनी गोडावूनमध्ये ठेवलेला कॉपर व झिक ( जस्त ) धातुचा माल, प्रिटर व डिव्हीआर मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करून आरोपी दिवाकर ब्रिजकिशोर जैयस्वाल (वय ४० वर्षे , रा. वागळे इस्टेट, ठाणे), इम्रान रहेमान शेख ( वय ३० वर्षे रा. मलाड ), मोहम्मद सोऐब अब्दुल कुद्स मेमन उर्फ सोनु (वय ३४ वर्षे, रा. मलाड ) या त्रिकुटाला अटक केली. अटक आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेले कॉपर व झिंक ( जस्त ) धातू असे एकूण १० लाख २३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल व चोरी केलेला माल वाहून नेण्याकरिता वापरलेले दोन वाहने अशी एकुण १४, लाख ७३ हजार रूपये किंमतीची मालमत्ता हस्तगत केली आहे.

हेही वाचा -Corona Update : राज्यात 3105 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.27 टक्के

  • दोन गुन्ह्यातील एकाच आरोपीकडून १६ लाख ८९ हजारांचे टी शर्ट जप्त -

आश्विनीकुमार यादगिरी पोटाबली ( वय ३८ वर्षे रा. भंडारी कम्पाउंड, भिवंडी ) यांचे मालकीचे काल्हेर गावात ' प्लॉस्ट अॅण्ड पोलीप्लेक्स प्रोडक्टस् ' कंपनीचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन २० ऑगस्ट रोजी फोडून त्यामधील आरोपी मजिबुर रेहमान अब्दुल रेहमान इद्रीसी (वय २४ वर्षे , रा. पटेल कम्पाउंड, भिवंडी) याला अटक करून त्याच्याकडील पी.व्ही सी रोल व आयकॉन बँग ( पॅकींग मटेरीयल ) असा ORIGINAL JACE AND DECLIAN ' या कंपनीचे रूपये १६ लाख १८ हजार ६५० रुपयांचे एकुण १ हजार ३५० टी शर्ट हस्तगत करण्यात आले आहेत.

  • चौथ्या गुन्ह्यात १६ लाख ११ हजारांचा मुद्देमालसह दोन आरोपी अटक -

सुशील भगचंद्र जैन ( वय .४१ वर्षे) यांचे कोपर गावात होजेअरी फॅब्रीक कपडयाचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ठेवलेला एकुण १८ लाख ८६ हजार रूपयाचा होजेअरी फॅब्रीक कपडयाचा माल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा तपासादरम्यान तांत्रिक व गुप्त माहितीदारा मार्फत आरोपी मुमताज अहमद इनायत अली शाह (वय ४३ वर्षे रा , गोवडी मुंबई ), अख्तर अब्दुल जब्बार खान (वय .४३ वर्षे रा. गोवडी, मुंबई) यांना अटक केली आहे. आरोपीकडून १४ लाख ११ हजार -किमतीचे कपड्यांचे रोल आणि गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने असे एकुण १६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

  • पाचव्या गुन्ह्यातील १३ लाख ९१ हजारांचे कॉपर धातू जप्त -

किष्णाकुमार रामप्रसाद यादव ( वय -३७ वर्षे , दापोडे, भिवंडी ) यांनी नारपोली पोलीस ठाण्यात येवून तकार दिली की, २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२१ रोजीच्या दरम्यान दापोडे गावातील सीएमसी मेटल प्रा. लि. या कंपनीच्या गोडाऊनमधून लोखंडी पत्र्याचे १७ लाख ५० हजार रुपयांचे रोलींग शटर अज्ञात चोरट्याने लंपास केले. या चोरीचा तपास करून गुन्ह्यामधील आरोपी अमरीश शिवाजी जाधव (वय ४७ वर्षे, रा गुंदवलीगांव, भिवंडी), शिला नरेंद्र मिश्रा (वय ४० वर्षे, रा. गुदवलीगांव) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यत १३ लाख ५१ हजार रुपयांचे कॉपर हस्तगत केले. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १५, लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केली आहे. असे एकूण पाच गुन्ह्यांमध्ये एकूण ६३ लाख ९३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी स.पो नि. चेतन पाटील, पोउपनिरी रोहन शेलार यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती डीसीपी योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा -निवासी डॉक्टरांच्या प्रश्नावर सचिवांच्या बैठकीतही तोडगा नाही; बेमुदत संप सुरुच

Last Updated : Oct 1, 2021, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details