ठाणे- महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक वादग्रस्त संदेश टाकला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने पालिकेच्या महासभेत म्हटले होते. त्याबाबत पुढे काय झाले हे तो संबंधित अधिकारीच सांगू शकतो, अशी सावध प्रतिक्रिया महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याप्रकरणी संबंधित अधिकारीच सांगू शकतो - महापौर - naresh mhaske
एखादा वरिष्ठ अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला राजकीय व्यक्तींसंदर्भात अशाप्रकारे व्हॉट्सअॅप ग्रुपवर कसा काय बोलू शकतो? असा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी यावेळी केली होती.

महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याप्रकरणी संबंधित अधिकारीच सांगू शकतो - महापौर
महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याप्रकरणी संबंधित अधिकारीच सांगू शकतो - महापौर
हेही वाचा -कन्हैया कुमारवर चालणार देशद्रोहाचा खटला.. दिल्ली सरकारची परवानगी
या कथित संदेश प्रकरणाबाबत गेल्या आठवड्यात आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. एखादा वरिष्ठ अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला राजकीय व्यक्तींसंदर्भात अशाप्रकारे वॉट्सअप ग्रुपवर कसा काय बोलू शकतो? असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.