महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमेदवारी न मिळाल्याने नाराज पण... - भाजप

विधानसभा निवडणुकीमध्ये युती जरी झाली असली तरी ठाणे शहरात सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नरेश म्हस्के

By

Published : Oct 2, 2019, 4:33 PM IST

Updated : Oct 2, 2019, 5:29 PM IST

ठाणे- विधानसभा निवडणुकीमध्ये युती जरी झाली असली तरी ठाणे शहरात सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील जागा ही मागील निवडणुकीत युती न झाल्यामुळे भाजपकडे गेली होती. भाजपचे आमदार म्हणून संजय केळकर हे निवडून आले होते. तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे सध्याचे विधान परिषद आमदार रविंद्र फाटक हे पराभूत झाले होते.

बोलताना नरेश म्हस्के

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपने सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या लोकसभेच्या रॅलीत आणि प्रचारात भाजपने पाठ दाखवली होती. त्याचाच राग म्हणून ठाणे शहरातील जागा ही सेनेलाच द्यावी, असा हट्ट शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत आहे.

हेही वाचा - ठाण्यात मनसेचे 'दिघे कार्ड'; दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन फोडला प्रचाराचा नारळ

सेना पदाधिकारी आणि ठाणे महानगरपालिका सभागृहनेते नरेश म्हस्के यांना ठाणे शहरातून विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत असताना, या विधानसभा क्षेत्रात संजय केळकर यांची युतीतून पुन्हा वर्णी लागली आहे. त्यामुळे कुठेतरी सेनेमध्ये नाराजीचे सूर दिसत आहे. दुसरीकडे नरेश म्हस्के हे देखील नाराज असून पक्षाचा निर्णय हा अंतिम निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे युतीच्या विरोधात जाणार नसल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे. तर आता मुळात प्रश्न सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची नाराजी कोण आणि कशाप्रकारे दूर करणार हेच पाहणे गरजेचे राहणार आहे. तर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे कालच सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - १५ वर्षे राज्य केले मात्र आम्ही सुडाचे राजकारण केले नाही - अजित पवार

Last Updated : Oct 2, 2019, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details