ठाणे- डोंबिवलीतील एका तरुणीला एअरहोस्टेस व्हायचे होते. मात्र, ती नशेच्या एवढ्या आहारी गेली की, नशेसाठी तिने चोऱ्यामाऱ्या सुरू केल्या. त्यातच मोबाईल लंपास करताना पकडलेल्या या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. नंदनी जैन, असे या मित्रांच्या संगतीने गुन्हेगारीत शिरकाव करणाऱ्या या तरुणीचे नाव आहे.
डोंबिवली पूर्व कडील सारस्वत कॉलनीमधील जय गंगे शिवकृपा सोसायटी राहणारा गौरव टाकले हा तरुण सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या परिसरात उभा राहून मोबाईलवर बोलत होता. इतक्यात दुचाकीवरून 3 अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आल्या. त्यानंतर अचानक दुचाकीवर बसलेल्या तरुणीने गौरवच्या हातातून मोबाईल हिसकावला आणि दुचाकीस्वार तरुणाने दुचाकीच रेस केली. यादरम्यान, गौरवने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचे जॅकेट पकडले. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही जमिनीवर पडले.
हेही वाचा -शासनाच्या आदेशाला पालकमंत्र्यांकडूनच केराची टोपली, मास्कवाटप कार्यक्रमात धक्काबुक्की
गौरवाने जमिनीवर पडलेल्या जखमी तरूणीला पकडून ठेवले . मात्र, या तरुणीचे दोन साथीदार धनाजी जाधव आणि दिव्या असे दोघे पळून गेले. दरम्यान, रामनगर पोलिसांनी नंदिनी जैन या तरुणीला अटक केली आहे. तर पोलिसांचे पथक नंदनीच्या 2 फरार साथीदारांचा शोध घेत आहे.
विशेष म्हणजे नंदिनी ही उच्चभ्रू कुटुंबातील आहे. तिचे वडील तिला एअरहोस्टेस बनविण्याचे प्रयत्न करत होते. मात्र, नंदिनी नशेच्या एवढी आहारी गेली की, तिने आपल्या नशेबाज मित्रांसोबत चोऱ्या-वाटमाऱ्या सुरू केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहिरे यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, अटक आरोपी नंदीनी ही एका वेळी एकच कपडे वापरते . वापरलेले कपडे ती पुन्हा वापरत नसल्याचे सांगितल्याने हे ऐकून पोलीसही आवक झाले आहेत. या तरुणीला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा -कहर कोरोनाचा: विनापरवाना कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार