ठाणेNanavare couple suicide case : ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी चारही आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती तक्रारदार ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे. गृहमंत्री फडणवीस यांचं, पंतप्रधान मोदींचं नाव घेऊन मृतक भावाला न्याय देण्यासाठी बोट छाटून घेतल्यानं हे प्रकरण देशभर गाजलं होतं. पोलीस न्यायालयात आरोपी विरोधात ठोस पुरावे सादर न करू शकल्यानं आज चारही आरोपीना जामीन मंजूर करण्यात आला.
कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे असं जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख , वकील नितीन देशमुख यांनाही अटक पूर्व जामीन मिळाल्याची माहिती तक्रारदार धनंजय ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे.
पत्नीसह केली होती आत्महत्या : दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 8 ऑगस्टला पत्नी उज्वलासह उल्हासनगर 4 नंबर परिसरात असलेल्या राहत्या बंगल्याच्या तीन मजल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात सुरवातीला मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी आहे. त्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं.
आठ जणांविरोधात गुन्हा :पोलिसांनी घटनेच्या दिवशी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या खिश्यात एक चिठ्ठीही मिळाली होती. या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा ओमी टीम कलानीच्या जवळील कमलेश निकम, शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचा स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचा नेते नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची ही नावे आढळून आली होती. त्यानंतर व्हिडिओ, चिठ्ठीच्या आधारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला अठरा दिवस झाल्यानंतर ही पोलीस तपासाला वेग देत नाही. उलट गुन्हे शाखा प्रकरणाच्या तपास गुंडाळण्याचा मागे लागले असल्याचा आरोप करत मृतकाचा भाऊ धनंजय ननावरे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी उजव्या हाताचं एक बोट छाटून ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवत असल्याचं व्हायरल व्हिडिओत म्हटलं होतं.
ठोस पुरावा न्यायालयात सादर नाही- प्रकरणात चार अटक आरोपींना १८ ऑगस्ट रोजी हजर केले असता कोठडी २४ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता, २८ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा हजर केले असता चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची होती. मात्र २८ दिवस चारही आरोपी न्यायालयीन कोठडी (कारागृहात) २६ दिवस होते. तरीही तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना या चारही आरोपी विरोधात ठोस पुरावा आज न्यायालयात सादर करता आला नाही. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केल्याची माहिती फिर्यादीचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण; चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी
- Nanavare Couple Suicide Case : दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित
- Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आरोपीला पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी