ठाणे- स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवक डोक्यावर काळी टोपी घालतात. कारण त्यांना संविधान मान्य नव्हते. आता तर देशाचे संरक्षण कारणाऱ्या सैन्याची सरकारने चेष्टा केल्याची टीका काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. भिवंडी लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी अंबाडी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवकांच्या डोक्यावर काळी टोपी - नाना पटोले
स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी आरएसएस स्वयंसेवक डोक्यावर काळी टोपी घालतात.अशी टीका काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले, की आरएसएसची निर्मिती संकुचित विचाराने झाली असून त्यांना देशाबद्दल कधी प्रेम नव्हतेच. त्यामुळे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यास नेहमीच विरोध करत इंग्रजांकडून फडणवीस, चिटणीस या पदव्या मिळवल्या. आरएसएसला कोणत्याही धर्माबद्दल प्रेम नाही. त्यांना फक्त या देशातील संविधान बदलून पुन्हा पेशवाई आणायची आहे. नागपूर सारख्या विदर्भ भागाची भौगोलिक रचना पाहता तेथे डोक्यावर काळी टोपी घालणारे कोणी नाही. मात्र, आरएसएसने स्वातंत्र्यास विरोध करण्यासाठी काळी टोपी घातली, असे पटोले यावेळी म्हणाले.