ठाणे- देशामध्ये झुंडबळीसारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये 'वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया'च्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता.
कल्याणमध्ये झुंडशाही विरोधात मुस्लीम समाजाचा मोर्चा - ठाणे
मॉबलिंचिंग सारख्या घडत असलेल्या मोठ्या घटनांविरोधात कडक कायदे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत आंदोलनकर्त्यांनी कल्याणच्या तहसीलदारांना निवेदन दिले.

गेल्या काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये तबरेज अन्सारी या तरुणाला जमावाने मारहाण केली. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटलेले पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे कल्याणमध्ये मोर्चा काढण्यात आला. शहरातील गफूर डोन चौकातून निघालेला हा मोर्चा कल्याण तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी अशा झुंडशाहीच्या घटनांचा निषेध करण्यात आला. तसेच झुंडबळी सारख्या घडत असलेल्या मोठ्या घटनांविरोधात कडक कायदे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत आंदोलनकर्त्यांनी कल्याणच्या तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये मुस्लिम समाजातील युवक, वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.