महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये चार हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला कल्याणमधून अटक - kalyan latest crime news

तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी विरेंद्र कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१८ मध्ये तो काही दिवसांसाठी जामिनावर बाहेर आला होता. डिसेंबर २०१९ मध्ये मोबाईलच्या किरकोळ वादातून विरेंद्रने एका तरुणाची भर चौकात हत्या केली.

यवतमाळमध्ये चार हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला कल्याणमधून अटक
यवतमाळमध्ये चार हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला कल्याणमधून अटक

By

Published : Feb 7, 2021, 12:30 PM IST

Updated : Feb 7, 2021, 7:06 PM IST

ठाणे - यवतमाळ शहरात चार हत्या करुन दोन वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कल्याण पूर्व भागातून अटक केली. विरेंद्र उर्फे विन्या अशोक कोल्हे (वय ३१ रा. पाटीपुरा, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

२ वर्षापासून पोलिसांना गुंगारा..

तीन जणांची हत्या केल्याप्रकरणी विरेंद्र कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१८ मध्ये तो काही दिवसांसाठी जामिनावर बाहेर आला होता. डिसेंबर २०१९ मध्ये मोबाईलच्या किरकोळ वादातून विरेंद्रने विनय राठोड या तरुणाची भर चौकात हत्या केली. हत्येनंतर तो फरार झाला विशेष म्हणजे यवतमाळ शहराच्या लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच २०१४, आणि २०१५ तसेच २०१८ मध्ये या तीन वर्षात त्याने तीन हत्या केल्याचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. तर २०१२ मध्ये एका गंभीर हाणामारीच्या गुन्हयात त्याला अटक झाली होती. फरार झाल्यानंतर तो कल्याणमधील एका सर्विस सेंटरवर ओळख लपवून दुचाकी, चारचाकी वाहने धुण्याचे काम करु लागला. एवढचं नाही तर कल्याणमध्येच एका वडापावच्या गाडीवरही तो कामाला होता. तर एका मिलमध्येही त्याने रात्रपाळीचे काम मिळवले होते. विरेंद्रवर चार हत्येचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, प्रत्येक हत्येनंतर तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी व्हायचा. विषेश म्हणजे पोलिसांना चकवण्यात त्याचा हातकखंडा बसला होता.

आरोपी विरेंद्र उर्फे विन्या अशोक कोल्हे

पुढील कारवाईसाठी यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात..

विरेंद्र कल्याण पूर्वेत चक्की नाका परिसरामध्ये काम करत असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी चक्की नाका परीसर परिसरात सापळा रचला. पथकाकडे विरेंद्रचा फोटो असल्याने फोटोत दिसणाऱ्या वर्णनासारखा एक व्यक्ती लोकग्राम कॉर्नर येथील श्री तिसाई सर्व्हिस सेंटरमध्ये दुचाकी धूत असताना पथकाला आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करत कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पुढील कारवाईसाठी त्याला यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Last Updated : Feb 7, 2021, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details