ठाणे :मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील मुंबई-नाशिक पाइपलाइनजवळ सोमवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सोनाळे गावचे पोलीस पाटील शत्रुघ्न पाटील यांनी या घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांसमोर अनोळखी महिलेची ओळख पटवणे आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे हे आव्हान होते. मात्र रात्री उशिरा पोलिसांना मृत महिलेची माहिती मिळावी यासाठी पोलिस पथकाने काम सुरू केले होते.
पतीने उकलले रहस्य: पोलीस तपासाअंती मृत महिलेचे नाव रमशा अब्दुल रहमान अन्सारी असल्याचे समोर आले. तसेच ती कुटुंबासह भिवंडी शहरातील शांतीनगर भागातील अजमेर चौक भागात राहत होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली. दरम्यान, पतीवर संशयाची सुई फिरवल्यानंतर पोलीस पथकाने मृत महिलेचा पती अब्दुल रहमान बिलाल अन्सारी याला भिवंडीतील बिलाल नगर, येथून पहाटे अडीच वाजता ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान सांगितले की, त्यांच्या वृद्ध वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना सोडून तो वेगळे राहण्यास तयार नव्हता. त्यातच पत्नीने पतीला सासरपासून दूर राहण्याचा वारंवार तगादा लावला होता. मात्र आरोपी पती हा पत्नीच्या वेगळे राहणाच्या तगाद्याला कंटाळला आणि त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला.