धक्कादायक ! परपुरुषाशी अश्लील चाळे करताना आढळल्याने मुलांसमोरच पत्नीचा खून - पतीकडून पत्नीची खून
मोहम्मद मुस्ताक भंगार विक्रेता असून तो हा मृत पत्नी व ५ मुलांसह भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील एका इमारतीमध्ये राहतो. शनिवारी (१९जून ) रोजी आरोपी पती रात्रीचे जेवण करून त्याच्या पत्नीसह सर्व कुटुंबीय झोपलेले होते. त्यानंतर मात्र, रविवारी सकाळी उठल्यानंतर त्याला त्याची पत्नी अंथरुणावर दिसली नाही. त्यामुळे त्याने पत्नीचा शोध सुरू केला. त्यावेळी आरोपी पतीला तो राहत असलेल्या दुसऱ्या खोलीतच एका परपुरुषाशी अश्लील चाळे करताना पत्नी आढळून आल्याने त्याने चारित्र्याच्या संशयावरून मुलांसमोरच तिच्या चेहऱ्यावर बेल्डने वार करत केबल वायरने गळा आवळून तिचा खून केला.
ठाणे - परपुरुषाशी अश्लील चाळे करताना पत्नी आढळून आल्याने मुलांसमोरच पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर बेल्डने वर करत केबल वायरने गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील एका इमारतीमध्ये घडली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मुस्ताक हयातुल्ला शाह (३५) असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर आबिदा शाह (३२) असे मृत पत्नीचे नाव आहे.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर घडला प्रकार -आरोपी पती मोहम्मद मुस्ताक भंगार विक्रेता असून तो हा मृत पत्नी व ५ मुलांसह भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील एका इमारतीमध्ये राहतो. शनिवारी (१९जून ) रोजी आरोपी पती रात्रीचे जेवण करून त्याच्या पत्नीसह सर्व कुटुंबीय झोपलेले होते. त्यानंतर मात्र, रविवारी सकाळी उठल्यानंतर त्याला त्याची पत्नी अंथरुणावर दिसली नाही. त्यामुळे त्याने पत्नीचा शोध सुरू केला. त्यावेळी आरोपी पतीला तो राहत असलेल्या दुसऱ्या खोलीतच एका परपुरुषाशी अश्लील चाळे करताना पत्नी आढळून आल्याने त्याने चारित्र्याच्या संशयावरून मुलांसमोरच तिच्या चेहऱ्यावर बेल्डने वार करत केबल वायरने गळा आवळून तिचा खून केला.
पत्नीचा खून स्वतःच पोलीस ठाण्यात हजर -खळबळजनक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीचा खून स्वतःच पोलीस ठाण्यात हजर राहून या धक्कादायक घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नारपोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला. तर याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक कलगोंडा पाटील यांच्या तक्रारीवरून भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली. आज (सोमवार) दुपारी आरोपी पतीला न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. .या घटनेचा पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव करीत आहेत.