महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Murder : धक्कादायक ! अनैसर्गिक संबंधांच्या वादातून सहकाऱ्याची हत्या, आरोपी अटक

ठाण्यात अनैसर्गिक संबंधाच्या वादातून सहकाऱ्याचा गळा कापून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कृष्णानंद मुनियन (वय ५५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चिखलोली पाड्यात असलेल्या मगर चाळीतील एका खोलीत ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Thane Murder
Thane Murder

By

Published : Jun 20, 2023, 7:55 PM IST

Updated : Jun 20, 2023, 9:27 PM IST

पोलीस निरीक्षक अशोक भगत माहिती देतांना

ठाणे :अनैसर्गिक संबंधांच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीची राहत्या घरातच गळा चिरून निर्घृण हत्या त्याच्याच सहकाऱ्याने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्वेतील चिखलोली पाड्यात असलेल्या मगर चाळीतील एका खोलीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. कृष्णानंद मुनियन (वय ५५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घरातच दोघांनी दारू पार्टी केली :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्वेतील चिखलोली पाड्यात असलेल्या मगर चाळीत मृतक कृष्णानंद हा राहत होता. तो अंबरनाथ एमआयडी सीमधील एका कंपनीत फेब्रिकेशनचे काम करत होता. त्यातच रविवारी १९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास मृतक कृष्णानंद हा कंपनीतून येताना कंपनीतच सोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याला दारू पाजण्याच्या बाहण्याने घरी आणले होते. त्यानंतर घरातच दोघांनी दारू पार्टी केली होती. मात्र पार्टी करताना रात्री उशीर झाल्याने मृतकने आरोपीला मुक्काम करण्यास भाग पाडले होते.

अनैसर्गिक संबंध करण्याचा प्रयत्न :त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास मृत कृष्णानंद याने सोबत आलेल्या सहकाऱ्याशी अश्लील चाळे करत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. तर आरोपीला अचानक घडत असलेल्या त्या घटनेचा राग आला. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन सोबत आलेल्या त्या आरोपी सहकाऱ्याने त्याच्याच घरातील धारदार चाकू घेऊन कृष्णानंद याचा गळा चिरला. नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास मृत कृष्णानंदच्या शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेने त्याची घरा बाहेर दारातच चप्पल पाहून नळाचे पाणी भरण्यासाठी दार ठोठावून कृष्णानंदला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ झाला दार उघडले नसल्यामुळे शेजाऱ्याच्या मदतीने अखेर दार तोडून घरात प्रवेश केला, असता कृष्णानंदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला.

हत्येची कबुली : घटनेची माहिती सोमवारी १९ जून रोजी सकाळच्या सुमारास पोलिसांना मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी श्वान पथकासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत कृष्णानंदचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उल्हासनगर मधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना करून शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही तासात शिवाजीनगर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असता, त्यानेच हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपीने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कृष्णानंद याने आरोपीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यातून वाद होऊन आरोपीने हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -Pune Crime News: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच; दुसऱ्या दिवशी तळजाई परिसरात 30 गाड्या फोडल्या

Last Updated : Jun 20, 2023, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details