ठाणे -घरात घुसून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम परिसरातील दत्ता आळी परिसरातील एका घरात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खळबळजनक! घरात घुसून वृद्ध महिलेची हत्या - Thane Crime News
घरात घुसून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम परिसरातील दत्ता आळी परिसरातील एका घरात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
हंसाबेन प्रवीण ठक्कर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हत्या झाली तेव्हा ही महिला घरात एकटीच होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम परिसरातील दत्त आळीत मृत हंसाबेन कुटुंबासह राहत होत्या. काल रात्रीच्या सुमारास त्या घरात एकट्या असल्याचे पाहून अज्ञान मारेकऱ्याने घरात घुसून त्यांची हत्या केली. दरम्यान हा खळबळजनक प्रकार शनिवारी रात्री 9 च्या सुमारास समोर आला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेचा पंचानामा केला. तसेच त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.