महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुरबाड शहरात प्रदूषण आणि घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुरबाड नगरपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून निघणाऱ्या धुराच्या प्रदुषणासह शहरातील घाणीच्या साम्राज्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुरबाडमध्ये प्रदूषण
मुरबाडमध्ये प्रदूषण

By

Published : May 9, 2021, 12:06 PM IST

ठाणे - मुरबाड नगरपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून निघणाऱ्या धुराच्या प्रदुषणासह शहरातील घाणीच्या साम्राज्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच मुरबाड शहरामध्ये स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाल्याचे पाहवयास मिळत आहे. शहर दूषित करणाऱ्या कारखांन्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सकाळच्यावेळी ऑक्सिजन घेण्यासाठी मुरबाडकर जेव्हा बाहेर पडतात. शहराला लागून असलेल्या कारखान्यांच्या कचऱ्यातून वाट काढावी लागत असल्याचे सध्या चित्र पाहण्यास मिळत आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण ..वर्षभरापासून आधीच कोरोनाचा फैलाव त्यामध्येही शहरातील जागोजागी साचलेल्या कचऱ्याने मुरबाड शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे एम.आय.डी.सी. कंपन्यांना वेगळा कायदा आणि मुरबाड बाजारपेठेला वेगळा कायदा असा मनमानी कारभार सध्या मुरबाडचे स्थानिक प्रशासन करीत असल्याचा आरोप नागरिक करताना दिसत आहेत. स्वच्छ शहर- मुरबाड शहर अशा केवळ घोषणा केल्या जातात. मात्र मुरबाड एमआयडीसी मधील प्रदूषणाचे नियोजन शून्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या घाणीमुळे आता तर चाकरमान्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र समोर आहे.
मुरबाड शहरात प्रदूषण आणि घाण
प्रदूषण व कचरा करणाऱ्या कंपन्यांना दंड नाही ! ..मुरबाड मधील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा करणाऱ्या कंपन्याना कोणत्याही प्रकारचा दंड आकारल्या जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे. सामान्य मुरबाडकरांवर स्वच्छता अभियानातंर्गत ५०० रुपयाचा दंड भरण्याची सक्ती केली जात आहे. विशेष म्हणजे एमआयडीसी मधील कचरा कुठे विघटन केला जातो हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. वायू प्रदूषण करण्यात, जल प्रदूषण करण्यात आणि कारखान्या बाहेर कचरा करण्यात मुरबाड मधील पहिल्या तर निम्याहून अधिक कंपन्या या फक्त प्रदूषण करण्यासाठी आहेत का ? प्रदूषण खात्याचे या कडे लक्ष का नाही? मुरबाडकरांच्या आरोग्याशी कधीपर्यत खेळ करणार ? असा सवाल मुरबाडकर विचारताना दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details