महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना : ठाण्यात ५ बार व १ वाईन शॉपवर छापे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई - ठाणे महापालिका बार व वाईन शॉपवर छापे न्यूज

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तत्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे.

Thane Municipal Corporation raid news
ठाणे पालिकेचा ५ बार व १ वाईन शॉपवर छापा

By

Published : Feb 24, 2021, 8:05 PM IST

ठाणे -सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करीत शहरातील ५ बार व १ वाईन शॉप सील केले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोना : ठाण्यात ५ बार व १ वाईन शॉपवर छापे
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तत्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे.

या ठिकाणी झाली कारवाई

या कारवाईअंतर्गत वागळे प्रभाग समितीमधील धमाल बार अ‌ॅन्ड रेस्टॉरंट सहायक आयुक्त विजयकुमार जाधव यांनी सील केला. वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत सुरसंगीत बार अ‌ॅन्ड रेस्टॉरंट, स्वागत बार अ‌ॅन्ड रेस्टॉरंट आणि नक्षत्र बार अ‌ॅन्ड रेस्टॉरंट हे तीन बार आणि रेस्टॉरंटस सहाय्यक बाळासाहेब चव्हाण यांनी सील केले. मुंब्रा प्रभाग समिती मधील १ रेस्टॉरंट सहाय्यक आयुक्त सागर सांळुंखे, तर लोकमान्य सावरकर प्रभाग समिती मधील पांडुरंग वाईन शॉप सहायक आयुक्त कल्पित पिंपळे यांनी सील केले. सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details