महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२५ हजार कोरोना रुग्णांना बरे करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा धनत्रयोदशीच्या दिवशी सन्मान - कोविड योद्ध्यांसोबत आयुक्तांनी साजरी केली दिवाळी, ठाणे

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये सुमारे २५ हजार कोरोना रुग्णांना बरे करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा, धनत्रयोदशीच्या दिवशी सन्मान करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी कोवीड योद्ध्यांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा सन्मान केला.

Honor of Kovid warriors, thane
कोविड योद्ध्यांचा धनत्रयोदशीच्या दिवशी सन्मान

By

Published : Nov 13, 2020, 10:11 PM IST

ठाणे -कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये सुमारे २५ हजार कोरोना रुग्णांना बरे करणाऱ्या कोविड योद्ध्याचा धनत्रयोदशीच्या दिवशी सन्मान करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी कोविड योद्ध्यांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा सन्मान केला.

कंत्राटी तत्वावर नेमणूक केलेल्या आरोग्य पथकाची कामगिरी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची वाढ पाहून, महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून टाटा आमंत्रा कोविड सेंटर सुरू केले होते. आतापर्यंत या सेंटरमधून २५ हजार कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी व डॉक्टरांची कमतरता असल्याने, महापालिका प्रशासनाने याठिकाणी कंत्राटी तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी उत्तम पद्धतीने काम करून तब्बल 25 हजार कोरोना रुग्णांना बरे केले. त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणून आयुक्तांनी आज या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. आयुक्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोविड योद्ध्यांचा धनत्रयोदशीच्या दिवशी सन्मान

महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांनी गाठला ५१ हजारांचा टप्पा

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात पहिला रुग्ण २५ मार्च रोजी कल्याण पूर्वेत आढळून आला होता. हा रुग्ण विदेशातून येऊन डोंबिवलीतील एका नातेवाईकाच्या लग्न सोहळयाला उपस्थित राहिला. तेव्हापासूनच कोरोनाचा फ़ैलाव डोबिवलीच्या पूर्व भागात झपाट्याने वाढला. आतापर्यत ५१ हजार ५५१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ४९ हजार ३१८ रुग्ण बरे झाले. तर १ हजार २६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज १५८ नवे रुग्ण आढळून आले. तर ९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धनत्रयोदशी निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग आधिकारी डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता घनश्याम नंवागुळ यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details