महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या अवैध कत्तलखान्यावर छापेमारी; १९०० किलो मांस जप्त - अवैध कत्तलखान्यात १९०० किलो मांस जप्त

हा बेकायदेशीर मांस विक्रीचा धंदा भाजपच्या पूर्वाश्रमीच्या पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. सिकदर मुमताज अहमद खान,(४२) आणि मोहमद आसिफ अकरम कुरेशी (२८) अशी त्या दोन मांस विक्रेत्या आरोपींची नावे आहेत. या कारावईनंतर मुंब्रा परिसरात खळबळ उडालेली आहे.

अवैध कत्तलखान्यावर छापेमारी; १९०० किलो मांस जप्त
अवैध कत्तलखान्यावर छापेमारी; १९०० किलो मांस जप्त

By

Published : May 22, 2021, 6:55 AM IST

Updated : May 22, 2021, 7:10 AM IST

ठाणे - कुठलीही परवानगी नसताना अवैधरित्या निवासी परिसरात जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यावेळी १५ जनावरांचे तब्बल १९०० किलो मांस जप्त केले आहे. या मांसाची किंमत अंदाजे ४ लाख ५६ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा बेकायदेशीर मांस विक्रीचा धंदा भाजपच्या पूर्वाश्रमीच्या पदाधिकाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. सिकदर मुमताज अहमद खान,(४२) आणि मोहमद आसिफ अकरम कुरेशी (२८) अशी त्या दोन मांस विक्रेत्या आरोपींची नावे आहेत. या कारावईनंतर मुंब्रा परिसरात खळबळ उडालेली आहे.

भाजपच्या पूर्वाश्रमीचा पदाधिकाऱ्याचा कत्तलखाना

मुंब्रा परिसरात जनावरांच्या मासांची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. मात्र, यातील बहुतांश दुकानाधारकांकडे परवाना नसल्याची माहिती या कारवाईतून पुढे आली आहे. मुंब्रा कैसा येथे असलेल्या साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावर गाळा नं. ३ मध्ये अनधिकृतरित्या जनावरांची कत्तल करुन ते मांस विक्रीकरीता ठेवली असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी करून आरोपी सिकदर मुमताज अहमद खान,(४२) आणि मोहमद आसिफ अकरम कुरेशी (२८) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात भादंवि ४२९,३४, पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलाम ५, ९,११, आणि महानगर पालिका अधिनियम १९४९ कलम ३३१, ३३५, ३३६ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी १४ ते १५ जनावरांचे मुंडके आणि १९०० किलो मांस जप्त केल आहे.

भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या अवैध कत्तलखान्यावर छापेमारी


भाजपच्या पूर्वाश्रमीचा पदाधिकाऱ्याचा कत्तलखाना

मुंब्रा कौसा परिसरात बेकायदेशीर मासांच्या विक्रीचा धंदा तेजीत होता. कत्तल खाण्यातून जनावरांचे मांस आणणे महागात पडत असल्याने साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावरील गाळ्यातच जनावरांची कत्तल केली जात होती. तेथून बेकायदेशीरपणे मांस विक्री सुरू करण्यात येत होती. हे मांस विक्रीचे दुकान एका भाजपच्या पूर्वाश्रमीच्या पदाधिकारी सिकदर मुमताज अहमद खान याच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे. गोमांसाच्या विरोधात आंदोलने करणाऱ्या भाजप पदाधिकारीच्याच जनावरांचा कत्तल खाना असल्याने भाजपाच्या भूमिकेवरून परिसरात खळबळ माजली आहे.

भाजपच्या पूर्वाश्रमीचा पदाधिकाऱ्याचा कत्तलखाना


निवासी इमारतीच्या गाळ्यात जनावरांची कत्तल जनावरांची मासांची विक्री करणाऱ्या दुकानांना महापालिकेच्या वतीने परवाना देण्यात येतो. तर दुकानात विक्री करण्यात येणाऱ्या मांसाच्या विक्री ही अधिकृत कत्तल खान्यातून आणलेले मांसच विकण्याचा परवाना देण्यात येतो. मात्र मुंब्र्यात चक्क निवासी इमारतीच्या तळमजल्यातील गाळ्यात चक्क जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी दुकानात आणले जात होते. या कारवाईनंतर घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी कापलेल्या जनावरांचे निरीक्षण केले असता, कापलेल्या जनावरांचे मांस हे नक्की कोणत्या जनावराचे आहे हे सांगता येत नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा यांनी सांगितले.

Last Updated : May 22, 2021, 7:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details