ठाणे - १०-१० रुपये जमा करून राम मंदिर का बांधतले जात आहे. सरकार तर भाजपाचेच आहे, मग त्यांना पैशाची कमी कसली. आता तर एमआयएमही भाजपाच्या टीममध्ये आहे. निवडणूक आली की एका बाजुला भागवत तर दुसऱ्या बाजूला ओवेसी दाखवायचे आणि राजकारण करायचे, असे वक्तव्य अस्लम शेख यांनी केले. भाईंदर पश्चिम येथील अग्रवाल ग्राउंडमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते.
मंदिरासाठी पैसे का गोळा करत आहेत ?
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा महापौर बसणार, अशा विश्वास आहे. केंद्राच्या सर्व यंत्रणेचा भाजपा दुरूपयोग करत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकाही देशासोबत आपले संबंध चांगले राहिले नाहीत. आमच्या (राज्य) सरकारने कोरोना काळात कामगारांना उपाशी ठेवले नाही. मात्र, उत्तरप्रदेशमध्ये जे कामगार गेले त्याच्या सोबत गैरवर्तन करण्यात आले. हे सर्व आपण पाहिले आहे. भाजपाच्या नेत्यांनी हॉटेल, क्लब बनवले. तर, काँग्रेसनी शाळा आणि महाविद्यालये बनवली. आता १०-१० रुपये घेऊन राम मंदिर बांधले जात आहे. सरकार तर भाजपाचेच आहे, मग पैशाची कमी कसली? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला.