ठाणे Mumbai Crime News :अंधेरी भागात झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात हसन अजीज इराणी व जाफरी युनिस इराणी उर्फ बड्डा व इतर दोन आरोपीचा शोध घेत असतानाच, पोलीस पथकाला हे चोरटे इराणी वस्तीत लपून बसल्याची खबर मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यावर गुरुवारी मध्यरात्री अंधेरी पोलिसांचे (Andheri Police) एक पथक इराणी वस्तीत आरोपीच्या शोधासाठी आले होते. त्यावेळी स्थानिक खडकपाडा पोलिसांचे (Khadakpada Police) पथकही सोबत होते. त्यामुळे तिन्ही फरार आरोपीना अंधेरी पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं.
असा झाला हल्ला : दुसरीकडे पोलीस वस्तीत शिरल्याची माहिती मिळताच, इराणी आरोपीच्या कुटुंबीयांनी ओरडा करून वस्तीला जागं केलं. त्यानंतर अचानक वस्तीमधील महिला, पुरूषांच्या जमावानं पोलिसांवर दगडफेक, दांडके घेऊन पोलिसांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला (Attacked On Police) केला. या हल्ल्यात 10 पोलीस कर्मचारी जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (khadakpada Police Station) इराणी वस्तीतील १७ हल्लखोर आणि त्यांचे १५ अनोखळी साथीदारांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौशल्याने केले अटक: हल्ल्यावेळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपी फरार झाले तर एक आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. मुंबई, ठाणे, रायगडसह राज्याच्या विविध भागात नियमित विविध गुन्हे करून सराईत गुन्हेगार आंबिवली रेल्वे स्थानक लगत असलेल्या, इराणी कबिल्यात वास्तव्य करून असतात. विशेष म्हणजे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून या इराणी वस्तीत शेकडो गुन्हेगार पोलिसांनी अटक केली आहे. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ आणि आडबाजूने पळून जाण्यासाठी गुन्हेगारांना याठिकाणी सोयीस्कर जागा असल्यानं, बहुतांशी इराणी गुन्हेगार या वस्तीत आश्रय घेऊन असतात. कल्याण परिसरातील स्थानिक पोलिसांनी या वस्तीमधील इराणी नागरिकांच्या हल्ल्याची माहिती असल्यानं ते कौशल्यानं या भागातील आरोपीला अटक करतात.