नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही कंबर कसली आहे. सुरक्षेच्या उपाय योजनांच्या अंतर्गत 31 मार्चपर्यंत भाजीपाला आणि फळ बाजार दर गुरुवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. तसेच 31 मार्चपर्यंत भाजीपाला बाजारात दर गुरुवारी आणि रविवारी शेतीमालाची आवक बंद ठेवण्यात येईल, असेही सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले आहे.
अनिल चव्हाण, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती हेही वाचा -कोरोनाच्या धास्तीने ठाण्यातील आजीबाईंची शाळेला दांडी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात राज्यातून, परराज्यातून कृषीमाल येत असतो. त्याचबरोबर दररोज हजारो नागरिक, व्यापारी कामगारांचाही वावर बाजारात असतो. मालाची खरेदी करण्यासाठीही शेकडो किरकोळ व्यापारी मुंबई आणि उपनगरातून बाजार समितीच्या आवारात येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणारी बैठक बाजार समितीच्या आवारात मंगळवारी पार पडली. त्यात बाजार समिती सचिव अनिल चव्हाण, बाजारातील व्यापारी, बाजार समितीतील अन्य घटक प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांच्या सहमतीने हा दोन दिवसांच्या बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारातील गर्दी रोखण्यासाठी कमीत कमी लोकांनी बाजारात यावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा -कोरोनाचे सावट: 'डोहाळे'च्या निमित्ताने महिलांनी मास्क बांधून पार पाडला कार्यक्रम