ठाणे -राज्यात एसटी महामंडळाच्या संपामुळे नागरिकांचे हाल सुरू असताना आता महाविरतणचे कर्मचारी आंदोलनाच्या (MSEDCL workers agitation) तयारीत आहेत. याचे प्रमुख कारण प्रशासकीय बदल्या आणि मनमानी कारभार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. जर यात बदल झाला नाहीतर अखेर प्रकाशगढ (Prakashgadh thane) समोर आंदोलन करून काम बंद करण्याचा इशारा निदर्शने करताना दिला आहे.
एसटी कर्मचारी पाठोपाठ आता महावितरण कर्मचारीही आंदोलनाच्या पावित्र्यात
गेल्या दिड वर्षांपासून महावितरणच्या ठाणे विभागातील प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आणि बदल्यामुळे या काल (सोमवारी) महावितरणच्या विविध संघटनानी एकत्र येऊन मुख्यालयासमोर निदर्शने केली. महावितरणच्या इंटकची वीज कामगार, कामगार सेना, कामगार महासंघ, मागासवर्गीय संघटना, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स या संघटना एकत्र येत प्रशासकीय कामकाजा विरोधात निदर्शने केली.
गेल्या दिड वर्षांपासून महावितरणच्या ठाणे विभागातील प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आणि बदल्यामुळे या काल (सोमवारी) महावितरणच्या विविध संघटनानी एकत्र येऊन मुख्यालयासमोर निदर्शने केली. महावितरणच्या इंटकची वीज कामगार, कामगार सेना, कामगार महासंघ, मागासवर्गीय संघटना, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स या संघटना एकत्र येत प्रशासकीय कामकाजा विरोधात निदर्शने केली. यावेळी ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. शिवाय मंडल अधीक्षक अभियंता आणि अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी करीत कारवाईची मागणी केली. प्रशासन जाणूनबुजून काही मर्जीतील कामगाराना व अधिकाऱ्यांना पाठीशी घालून इतर संघटनांच्या मागणीला केराची टोपली दाखवत असून आता महावितरण कामगार हे सहन करणार नसल्याचे आंदोलन करणाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -ST workers strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा छोट्या व्यावसायिकांना फटका, अनेकांवर उपासमारीची वेळ