ठाणे - लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने लोकल रेल्वे खाली जाणाऱ्या माय-लेकाचा जीव वाचला. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तीन नंबरच्या फलाटावर ही घटना घडली. या घटनेचा थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला. मंगला गणेश सोनावणे (वय, ३२) आणि कार्तिक (वय ६) असे दुर्घटनेतून वाचलेल्या माय-लेकाची नावे आहेत.
मंगला सोनावणे या आपल्या दोन मुलांना घेऊन डोंबिवली रेल्वे स्थानकात आल्या होत्या. त्यांनी पुढील प्रवासासाठी मुलांसह मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मोठा मुलगा लोकलच्या डब्यात चडला मात्र, गर्दीच्या रेट्यामुळे कार्तिक आणि ते दोघेही फलाटावर लोकल लगत पडले. हा प्रकार तेथे असलेल्या डोंबिवली लोहमार्ग पोलीस कर्मचारी अनूप अब्राहम, बी. डी. लकडा आणि महिला कर्मचारी मनीषा गायकवाड यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ इतर प्रवाशांच्या मदतीने त्या दोघांना लोकल खाली जाण्यापूर्वी वाचवले.