ठाणे- पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने संतप्त पत्नीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाल्याने नवरा बायकोसह २ वर्षांची चिमुरडीही आगीत होरपळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये उपचारादरम्यान मायलेकीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. सुस्मिता मलिक (२८) व सुब्रोश्री मलिक (२ वर्षे) असे उपचारादरम्यान मृत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. दुसरीकडे रतिकांत मलिक (३५) हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
कौटुंबिक वादातून विवाहितेने घेतले जाळून; माय लेकीचा मृत्यू, पतीची मृत्यूशी झुंज - KILL
कौटुंबिक वाद झाल्याने संतप्त पत्नीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाल्याने नवरा बायकोसह २ वर्षांची चिमुरडीही आगीत होरपळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये उपचारादरम्यान मायलेकीचा मृत्यू
रतिकांत मलिक मूळचे ओरिसा राज्यातील असून ते भिवंडीत यंत्रमाग कारखान्यातील बीम भरण्याचे काम करतात. ते भादवड येथील पारसपाड्यात शत्रू तरे यांच्या चाळीतील खोलीत पत्नी व २ मुलींसह गेल्या ८ वर्षांपासून राहत आहे. शुक्रवारी त्याला सुट्टी असल्याने त्याने रात्रीच्या सुमाराला घरी जेवणासाठी मटन आणले होते. त्यावेळी दोघेही स्वयंपाक करण्यात गुंतलेले असताना अचानक नवरा बायकोमध्ये कौटुंबिक वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या सुस्मिताने जवळच असलेल्या कॅनमधील रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाल्याने त्यात नवराबायकोसह मुलगीदेखील भाजली.
शेजाऱ्यांनी या तिघांना उपचारासाठी प्रथम इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, या तिघांचीही प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी पती-पत्नीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात, तर मुलीला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. या आगीत सुस्मिता ९८ टक्के, रतिकांत २५ टक्के, तर मुलगी सुब्रोश्री ८० टक्के जळाले आहेत. या तिघा गंभीर जखमींवर उपचार सुरू असताना आई सुस्मिता व मुलगी सुब्रोश्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या जळीत कांडाची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) जी. जे. जैद करत आहेत.