महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात वॉन्टेड आरोपीने केला पोलिसांवर हल्ला; दोघे जखमी - ठाणे क्राईम न्यूज

अनेकदा आरोपींना पकडताना पोलिसांच्या जीवावरही बेतते. ठाण्यामध्ये एका आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्याला पकडले.

injured Police
जखमी पोलीस

By

Published : Oct 9, 2020, 12:50 PM IST

ठाणे - जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. नवनाथ धांगडे असे या आरोपीचे नाव असून, तो हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगाबाहेर बाहेर येऊन फरार झाला होता.

ठाण्यात वॉन्टेड आरोपीने केला पोलिसांवर हल्ला

श्रीनगर भागातील डोंगरावर झोपडीमध्ये नवनाथलपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-1ला मिळाली. त्याला पकडण्यासाठी पोलीस उपनरीक्षक दत्ता सरक आणि हवालदार आनंद भिलारे हे दोघे गेले. मात्र, त्याने शरणागती न पत्करता पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही पोलीस जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेत देखील त्यांनी गुन्हेगाराला सोडले नाही. जखमी पोलिसांवर वर्तकनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुन्हे शाखेने याअगोदर अनेकदा अशा प्रकारे वॉन्टेड आरोपींना पकडले आहे. यावेळीही हल्ला झालेला असतानाही जीवाची परवा न करता त्यांनी गुन्हेगारांना पकडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जखमींना भेटून त्यांची चौकशी व कौतुक केले.

ABOUT THE AUTHOR

...view details