ठाणे - ४७ बोगस शाळा ठाणे महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. ठाणे मनपा क्षेत्रात इंग्रजी माध्यमाच्या ४२, मराठी माध्यमाच्या २ आणि हिंदी माध्यमाच्या ३ शाळा अनधिकृत आहेत. या अनधिकृत शाळां विरुद्ध महापालिकेच्या शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे जाहिर केले आहे. या बोगस शाळांमध्ये राबोडी, मानपाडा, डायघर गाव, सुभाषनगर आणि ढोकाळी येथील प्रत्येकी एक शाळा असुन दिवा भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा आहेत. दरम्यान, या पाहणीत १२ बोगस शाळा आव्हाडांच्या कळवा - मुंब्रा परिसरातील असल्याचे समोर आले आहे.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा -आता उन्हाळ्याच्या सुट्टया संपल्याने पालिकेने अनधिकृत शाळांना दिलेल्या नोटीसांमुळे जर त्या शाळा बंद झाल्या तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा शाळांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात अशा बेकायदेशीरपणे शाळा उभ्या कशा राहतात याकडे आमदारांनी देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचं असल्याचं शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत यांनी सांगितले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात अशा बेकायदेशीरपणे शाळा उभ्या कशा राहतात याकडे आमदारांनी देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचे आहे - शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर भगत