ठाणे - भिवंडीत सोमवारी एकाच दिवसात कोरोनाचे 24 नवे रुग्ण आढळून आले. या 24 रुग्णांपैकी चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, ग्रामीण भागातही आज 11 नवे रुग्ण आढळले आहेत.
भिवंडीत एकाच दिवशी 35 कोरोनाबाधितांची भर, तर चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद - corona effect thane news
सोमवारी भिवंडी शहरात 24 तर, ग्रामीण भागात 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर, शहरात आढळलेल्या 24 रुग्णांपैकी चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी ग्रामीण व शहरात एकूण 35 नव्या रुग्णांची भर पडली असून शहरातील 34 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भिवंडी शहरात आतापर्यंत 284 रुग्ण आढळले असून 133 रुग्ण बरे झाले आहेत. तर, शहरातील 21 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 130 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत 172 रुग्ण आढळले असून त्यापैकी 62 रुग्ण बरे झाले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून 107 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सोमवारी आढळलेल्या 35 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 456 वर पोहचला आहे. त्यापैकी 195 रुग्ण बरे झाले आहेत. तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून 237 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.