महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत ३२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर - डोंबिवली कोरोना रुग्णसंख्या

आज आढळून आलेल्या ३२९ कोरोनाबाधित रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३८ च्या घरात पोहचली आहे.

कोरोना घडामोडी
कोरोना घडामोडी

By

Published : Jul 30, 2020, 10:25 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात ३२९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३०८ कोरोनाबाधित रुग्णांना विविध रुग्णालयातून गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या ३२९ कोरोनाबाधित रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३८ च्या घरात पोहचली आहे. तर यामध्ये ५ हजार ७८७ रुग्ण सध्याच्या स्थितीत विविध रुग्णालयात उपचार घेत असून आत्तापर्यंत १३ हजार ५०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ३४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज आढळून आलेल्या ३२९ रुग्णांची विगवतवारी पाहता कल्याण पूर्व -८७, कल्याण प.-६८, डोंबिवली पूर्व -७९, डोंबिवली प-५१, मांडा टिटवाळा २४, तर मोहना येथील २० रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांपैकी १३९ रुग्ण हे कल्याण - भिवंडी रस्त्यावरील टाटा आमंत्रामधील कोविड केयर सेंटरमधून तर १२ रुग्ण डोंबिवलीतील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून तसेच बाज आर. आर. रुग्णालयांमधून ५ रुग्ण तसेच ४ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित १३ हजारांच्यावर रुग्ण विविध रुग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details