ठाणे : एका मटण विक्रेत्याने थर्टी फस्टच्या पार्टीसाठी मटणाची मागणी वाढणार असल्याने १२ हुन अधिक बकरे दुकानात आणून ठेवले (Ocassion of 31 December feast) होते. मात्र मटण विक्रीचे दुकान बंद असताना रात्रीच्या सुमारास दुकानाची खिडकी तोडून सर्व बकरे चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथील बुधाजी चौक भागातील मटण विक्रीच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात बकरे चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (goats stolen on Ocassion of 31 December) आहे.
बकऱ्यावर डल्ला :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अदनान ख्वाजा कुरेशी (२१, रा. कोनगाव, भिवंडी) असे मटण विक्रेत्याचे नाव आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षा निमित्त आयोजित विविध ठिकाणच्या मेजवानींसाठी मटण लागणार असल्याने मटण विक्रेेते अदनान यांनी १२ तगडे बकरे मानपाडा भागात असलेल्या महाराष्ट्र मटण शॉप या दुकानाच्या पाठीमागील बंदिस्त खोलीत आणून ठेवले होते. विशेष म्हणजे नवीन वर्षानिमित्त आयोजित मेजवान्यांना मटण पुरवठ्याची जबाबदारी मटण विक्रेता अदनान यांनी घेतली (12 goats stolen) होती.
खिडकीतूनचबकऱ्यांची चोरी :चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजुकडील खिडकीची लोखंडी जाळी (goats brought by mutton seller) तोडली. त्यामधून दुकानात प्रवेश केला. त्या खिडकीजवळ टेम्पो उभा करुन खिडकीतूनच सुमारे ४९ हजार रुपये किंमतीच्या बकऱ्यांची चोरी करण्यात आली आहे, असे तक्रारदार अदनान यांनी (Thane Crime News) सांगितले.