महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2020, 10:49 AM IST

ETV Bharat / state

कल्याणमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

कल्याणच्या सुभाष मैदानात 'राष्ट्रीय सूर्यनमस्कार' दिनानिमित्त सामुहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दररोज ८० सूर्यनमस्कार घालणाऱ्या रत्नागिरी येथील १०१ वर्षांच्या लक्ष्मीबाई दामले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होत्या.

हजारो विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार
हजारो विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

ठाणे - 'राष्ट्रीय सूर्यनमस्कार' दिनानिमित्त कल्याणच्या सुभाष मैदानात सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कल्याण शहरातील ५४ शाळांमधील १० हजार ६२२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

कल्याणमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती, सुभेदार वाडा कट्टा आणि माध्यमिक उच्च-माध्यमिक मुख्याध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज ८० सूर्यनमस्कार घालणाऱ्या रत्नागिरी येथील १०१ वर्षांच्या लक्ष्मीबाई दामले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होत्या. आयोजकांकडून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.

हेही वाचा - उल्हासनगरात रेशनच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड; दक्ष नागरिकाने गहू पकडला

या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वीणा जाधव आणि माजी आमदार नरेंद्र पवार हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details