महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिमझिम पावसाने आयुक्तांच्या बंगल्याबाहेर साचले पाणी - ठाणे पाऊस न्यूज

ठाण्यात शनिवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे पातलीपाडा येथे असलेल्या पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या बाहेर पाणी साचले होते.

रिमझिम पावसाने आयुक्तांच्या बंगल्या बाहेर साचले पाणी
रिमझिम पावसाने आयुक्तांच्या बंगल्या बाहेर साचले पाणी

By

Published : Jun 5, 2021, 7:21 PM IST

ठाणे - ठाण्यात शनिवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे पातलीपाडा येथे असलेल्या पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या बाहेर पाणी साचले होते. पावसाच्या या छोट्या सरीने पाणी साचल्याने गटारे सफाईचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच घोडबंदर रोड येथे महामार्गावर पाणी साचल्याने ठाणेकरांना पाणी तुंबण्याचा त्रास सहन करावा लागला होता. दिवसभरात ठाणे शहरात फक्त 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

वातावरणात गारवा जाणवू लागला

मान्सूनच्या पहिल्या पावसाने शहरात सुरुवात केली असून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते. तर दुसरीकडे पडणाऱ्या पावसामुळे वाहने रस्त्यावर धीम्या गतीने धावत आहे. सध्या तरी पावसाने जोर घेतला नसला तरी काही सखोल भागात किरकोळ पाणी साचले होते. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे छत्री, रेनकोट नसल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. तर पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद देखील नागरिकांनी घेतला.

नालेसफाईची पोलखोल
मान्सूनपूर्व शहरातली सर्व नाले सफाई तसेच गटारांची सफाई करण्यात आली असल्याचा दावा पालिकेने केला होता. मात्र महामार्गाच्या बाजूला असलेल्या गटारांची सफाई झाली नसल्याने पावसाचे पाणी जाण्यास विलंब लागत होता. पातलीपाडा येथे ठामपा आयुक्तांच्या बंगल्याच्या बाजूला डोंगरीपाडा परिसर आहे, त्यामुळे वरून पाणी वाहून येऊन बंगल्याबाहेर पाणी साचले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details