कल्याण (ठाणे) -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने निर्बंध लादले असून राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही, असा सवाल काही घटनांमुळे उपस्थित होत आहे. कुठे आठवडा बाजार, कुठे बारमध्ये बसून मद्यपान केले जात आहे आणि आत्ता तर मोठय़ा जल्लोषात हळदी सभारंभ आयोजित करण्यात आला. या हळदी सभारंभात बैल नाचवत त्यावर चक्क पैशाची उधळण करण्यात आली. शिवाय या हळदी समारंभात शेकडो लोक उपस्थित होते. हा प्रकार कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा गावातील एका हळदीच्या कार्यक्रम घडला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संचारबंदीसह कोरोना आपत्ती अधिनियमानुसार आयोजकांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कसा येणार कोरोना नियंत्रणात.. ठाण्यात हळदी समारंभात चक्क बैल नाचवत पैशांची उधळण, पाहा व्हिडिओ - ठाण्यात कोरोना काळात हळदी समारंभ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने निर्बंध लादले असून राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही, असा सवाल काही घटनांमुळे उपस्थित होत आहे. कुठे आठवडा बाजार, कुठे बारमध्ये बसून मद्यपान केले जात आहे आणि आत्ता तर मोठय़ा जल्लोषात हळदी सभारंभ आयोजित करण्यात आला.
कल्याण पूर्व भागातील चिंचापाडा गावातील रहिवासी प्रकाश म्हात्रे यांचा मुलगा वैभव याचा हळदी कार्यक्रम काल रात्रीच्या सुमारास होता. विशेष म्हणजे २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडावेत असे नियम असताना नियमांची पायमल्ली असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या संख्येने लोक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हळदी व लग्न सोहळ्याला उपस्थित राहत असतील तर, कोरोनाला आळा कसा बसेल. शिवाय दिवसागणिक कल्याण डोंबिवलीत हजरोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांवर शासनाने कोठार कारवाई करावी, अशी मागणी या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे होत आहे.
कोरोना आणि कायद्याची भिती राहिली नाही -
याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे नागरिकांना कोरोना आणि कायदयाची भिती राहिली नाही. या लोकांचे करायचे काय, असा यानिमित्ताने सवाल उभा ठाकला असल्याचे चित्र दिसत आहे.