ठाणे - एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा संतापजनक प्रकार शाळेतील मुख्याध्यापकानेच केला आहे. प्रमोद रामदेव नायक (४२) असे या नराधमाचे नाव आहे. येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला ३० डिसेंबरपर्यंत म्हणजे ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एका १४ वर्षीय मुलीवर या नराधमाने अश्लील चाळे करून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. भिवंडी तालुक्यातील शेलार नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. यानंतर मुख्याधापक प्रमोद नायक याला गुरुवारी संतप्त नागरिक व पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले होते.