महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : ठाकरे गटाचे नरेश मणेरा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; गृहिणीवर ठाकरे समर्थकांचा हल्ला - नरेश मणेरा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

ठाकरे गटाकडून एका मराठी गृहिणीवर जीवघेणा हल्ला करून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री घोडबंदर भागात घडली. याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Crime
विनयभंग

By

Published : Feb 10, 2023, 10:47 PM IST

ठाणे: नरेश मणेरा यांनी ठाण्याचे उपमहापौर पदही भूषवले आहे. ठाण्यातील घोडबंदर भागात राहणाऱ्या पीडित महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ठाकरे गटाचे ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात जोरदार हुल्लडबाजी सुरू होती. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील आले होते. मराठी माणसांच्या न्याय हक्काच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे.

महिलेला जबर मारहाण: गुरुवारी रात्री पीडित महिला घरामध्ये असताना कार्यक्रमातील कर्णकर्कश ध्वनिक्षेपकाच्या आवाजाचा त्रास झाला. त्यामुळे त्या याबाबतची तक्रार करण्यासाठी नरेश मणेरा यांना भेटण्यास गेल्या. त्यावेळी तेथील महिलांनी त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या सर्वांगावर मारहाणीचे व्रण उठले. तसेच नरेश मणेरा यांनी त्यांचा गळा दाबून त्यांच्या सोबतच्या १० ते १२ महिला आणि पुरुषांनी मारहाण करून विनयभंग केला. या दरम्यान गळ्यातील सोनसाखळीही चोरीला गेल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही झाला होता वाद: घोडबंदर रोडवरील स्वस्तिक सोसायटी समोर होणाऱ्या या कार्यक्रमात दरवर्षी नियमांचे उल्लंघन होते. याबाबतीत पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलीस कोणत्याही प्रकारे कारवाई करत नसल्यामुळे शेवटी लहान मुलांना होणारा त्रास न पाहिल्याने त्यांनी शेवटी स्वतः जाऊन स्पीकर बंद करण्याची मागणी केली. याचाच राग मनात घेऊन या पीडितेवर हल्ला करण्यात आला.

वृद्धेचा विनयभंग :ठाण्यातील डोंबिवली पूर्व भागातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात १६ ते १९ फेब्रुवारीच्या दरम्यान पीडित महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान वृद्ध महिला एक्स-रे करण्यासाठी रूम मध्ये गेली असता वॉर्डबॉयने त्या पीडित महिलेशी 22 फेब्रुवारी, 2022 रोजी अश्लील वर्तन केले होते. मात्र हा प्रकार चुकून घडला असावा असे तिला वाटले. परंतु या आरोपी वॉर्डबॉयने दुसऱ्यांदा तसाच प्रकार केल्याचे पीडितेने ही बाब आपल्या मुलीला सांगितली. उपचारानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार केशव हसगुळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून आरोपी कानदास वैष्णव याला अटक केली.

हेही वाचा:PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भारतीय रेल्वेचे कौतुक; म्हणाले....

ABOUT THE AUTHOR

...view details