ठाणे :मोबाईल जिहाद प्रकरणात मास्टरमाइंड असलेल्या शाहनवाजला शोधण्यासाठी गाझियाबाद पोलीस कार्यरत होते. धर्मांतराच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या बद्दो उर्फ शाहनवाज मकसूद खान (23) हा गाझियाबाद पोलिसांसोबतच मुंब्रा पोलिसांनाही गुंगारा देत होता. प्रथम तो मुंबईच्या वारली येथे लपला. अखेर मुंब्रा पोलिसांच्या पथकाने अलिबाग येथून त्याला बेड्या ठोकल्या. सोमवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मोबाईल द्वारे लोकेशन ट्रॅक केले :शाहनवाझ याच्या शोधासाठी मुंब्रा पोलिस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक कुंभार व पथकाने शोधकाम सुरु केले. आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाइल द्वारे आरोपी वरळी पोलिस ठाणे हद्दीत असल्याचा सुगावा लागला. पोलीस पथकाने त्वरित स्थानिक पोलिसांना संपर्क केला. परंतु आरोपी आलिबागला पळाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शाहनवाज याच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा पोलिसांचे पथक रायगड जिल्ह्यातील अलिबागला रवाना झाले. त्यांनी अलिबाग मधील लॉज, हॉटेल्स व इतर संभावित ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका लॉजमध्ये शाहनवाज असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. मुंब्रा पोलिसांच्या पथकाने त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या मदतीने शाहनवाज याला अटक करण्यात केली.